संतांच्या भागवत वारकरी संप्रदायातील वैचारिक #घुसखोरी बाबत जी काही 20 नाव आम्ही जाहीर केली. त्यांनी आमच्या खालील 25 प्रश्नांची नेमकी, सप्रमाण ,पुराव्यासह पत्रकार परिषद घेऊन जाहीर उत्तरं दिली तर त्यांचे मी सन्मानपूर्वक अभिनंदन करणार.... विकास लवांडे
1) ज्ञानोबा तुकोबा पेक्षा मनू श्रेष्ठ होता असे जाहीर विधान करणाऱ्या संभाजी भिडेंचा तुम्ही निषेध केला होता का? नसेल तर आत्ता जाहीर निषेध करणार का ?
2) संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचे ग्रंथ हे परिपूर्ण ग्रंथ नाहीत ते एक संकलन आहे. दासबोध हाच फक्त ग्रंथ आहे असे जाहीर वक्तव्य करणाऱ्या किशोर व्यास उर्फ गोविंद देवगिरीचा जाहीर निषेध केला होता का?
3) वैदिक सनातन धर्म प्रचलित असताना संतांनी स्वतंत्र भागवत धर्म अर्थात वारकरी संप्रदाय का सुरू केला ? तसेच #महानुभव पंथ , लिंगायत धर्म का सुरू झाला?
4) सर्वच संतांना प्रचंड त्रास देणारे, अनन्वित छळ करणारे , अपमान करणारे कोण लोक होते आणि त्यांनी का त्रास दिला होता ? त्यांची भूमिका किंवा विचार काय होते ?
5) मनुस्मृतीचा जाहीर निषेध करणार का ? किंवा केलेला आहे का ? कराल का ?
6) जाती वर्ण व्यवस्था मानता किंवा नाही स्पष्टीकरण देणार का ? जाती ,वर्ण ,#धर्म मानवनिर्मित आहेत की ईश्वरनिर्मित आहेत ? पंढरपूर मंदिर प्रवेश सर्वांसाठी खुला झाल्यानंतर विठ्ठल बाटला असे म्हणणारे स्वतंत्र मंदिर बांधून स्वतंत्र पूजा करणारे कोण लोक होते ?
7) तुमची धर्माची व्याख्या काय आहे ? धर्म व्यक्तिगत पातळीवर आचरण करण्याची बाब आहे की राजकीय संघटन, प्रदर्शन करण्याची बाब आहे ?
8) कोणतेही #कर्मकांड, व्रत वैकल्ये, होम हवन, यज्ञ , पुरोहित शाही वगैरे मानता किंवा समर्थन करता काय ? वारकरी संतांनी त्याबाबत काय सांगितले ?
9) प्रचलित इतर धर्मांचा आदर करता की द्वेष करता ?
10) तुमचा हिंसेवर विश्वास आहे की अहिंसेवर विश्वास आहे ?
11) तुम्ही पुरोगामी की #प्रतिगामी विचार मानता ? म्हणजे दुसऱ्या भाषेत वारकरी की धारकरी ? तुकाराम की #नथुराम ?
12) भारतीय संविधान ,लोकशाही , अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानता किंवा नाही ?
13) किर्तन प्रवचनातून हिंदुत्ववादी भूमिका मांडणे किंवा परधर्माचा द्वेष करणे, राजकीय पक्षाचा एकांगी प्रचार करणे हे वारकरी संतांच्या विचारांना मान्य आहे का ? कोणत्या ग्रंथात लिहिले आहे?
14) कौरव आणि पांडवांचा धर्म वेगवेगळ्या होता की एकच होता ? त्यांचा धर्म कोणता होता ?
15) राम आणि रावणाचा धर्म एकच होता की वेगवेगळ्या होता ? त्यांचा धर्म कोणता ?
16) मंबाजी स्वामी की संत तुकोबा ? दोन्ही तत्त्वज्ञान व दोन्ही विचारधारा वेगवेगळ्या होत्या व आहेत हे मान्य आहे का ? तुकोबांचा अभंग गाथा बुडवण्याची कारणे काय आहेत?
17) हिंदू धर्माचे संस्थापक कोण ? आणि धर्मग्रंथ कोणता आहे ? इतका चांगला धर्म डॉ. आंबेडकरांनी धर्मांतर का केले? आपला हिंदू धर्म पालन करण्याची नियमावली/ आचारसंहिता कोणत्या ग्रंथात लिहिली आहे तो ग्रंथ व लेखक कोण आहेत ?
18) शिव ,शाहू ,फुले, गांधी, आंबेडकरांचे विचार तुम्हाला पटतात की नाही ? शाहू महाराजांच्या बाबतीतील वेदोक्त की पुराणोक्त प्रकरण याबाबत तुमचे मत काय?
19) रामदास स्वामींचा संप्रदाय वेगळा आहे. संतांच्या भागवत वारकरी संप्रदायाशी त्यांचा काहीही संबंध नाही आणि ते #छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते हे मान्य आहे का ?
20) वारकरी संप्रदाय सर्व जाती धर्मांना सामावून घेणारा आहे आणि जात, धर्म ,लिंग, पंथ, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव वारकरी संप्रदायात नसतो व नाही ती परंपरा तुम्हाला मान्य आहे का ?
21) वैदिक #सनातन धर्माचे आणि #भागवत वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान ग्रंथ, आराध्य दैवत, आराधना पद्धती आणि तीर्थक्षेत्र वेगवेगळे आहेत हे सर्वश्रुत आहे पण ते तुम्हाला मान्य आहे का ?
22) गाय देवता नसून उपयुक्त पशु आहे असे सांगणारे वि. दा. सावरकर आणि कॉ. सरदार भगतसिंग विज्ञाननिष्ठ होते व #स्तिक होते हे सर्वश्रुत आहे. याबाबत तुमची भूमिका सविस्तर सांगाल का?
23) छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे, महात्मा फुले दांपत्य इत्यादी महापुरुषांचा विशिष्ट लोकांकडून वारंवार जाहीर अवमान केला जातो त्याबाबत तुम्ही कधीही जाहीरपणे निषेध का करत नाही ?
24) बेरोजगारी, महागाई, शिक्षण,आरोग्य तसेच महिलांवरील रोज होणारे अन्याय, अत्याचार, पेपरफुटी, भ्रष्टाचार इत्यादी प्रश्न याबाबत तुम्ही आवाज का उठवत नाही ? या प्रश्नांमुळे आपला स्वधर्म पाळणारे कोट्यवधी सामान्य लोक अडचणीत आहेत म्हणजे सर्वच धर्म धोक्यात आहेत असे वाटत नाही का ?
25) स्वामी विवेकानंद, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, इरावती कर्वे, एस. एम. जोशी, साने गुरुजी, विनोबा भावे, नानासाहेब गोरे, भाई वैद्य, गं.बा.सरदार इत्यादी मान्यवरांनी जातीव्यवस्था , धर्म आणि धर्मव्यवस्था, समाजसुधारणा याबाबत चिकित्सक सखोल असे लेखन केलेले आहे. ते आपण वाचलेले असेल तर आपली त्याबाबतची मत काय आहेत ?
..... ह.भ.प.विकास लवांडे (16/5/2026)
( तळटीप : वारकरी संप्रदायातील वैचारिक घुसखोरी विरुद्ध ही आमची चळवळ #राजकीय नसून तात्विक वैचारिक पातळीवरची आहे. नोंद घ्यावी ज्यांना झेपत नाही त्यांनी वाचून गप्प बसावे.
0 टिप्पण्या