Top Post Ad

महारवतन जमीनीबाबत फसवणूक

     मुंबई  - किवळे,ता.हवेली.जि.पुणे येथील शेतकरी विजय गायकवाड यांनी महारवतन जमीनीबाबत फसवणूक झाल्याचा आरोप करीत दि.१२ मे पासून आझाद मैदान येथे आंदोलन सुरू करून त्याविषयी निवेदन महसुलमंत्री,नगरविकास मंत्री,महसुल सचिव यांना दिले आहे.याबाबत त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली.       त्यावेळेस किवळे येथील विजय गायकवाड यांनी त्यांच्या महारवतनाच्या जमीनीबाबत निवृत्त पोलीस अधिकारी विक्रम बोके,त्यांची पत्नी विभा बोके तसेच गिन्नी सिटी काॅर्पचे गौतम हरलालका यांनी कुलमुखत्यारपत्र बनवून अज्ञानाचा फायदा घेऊन गैरकृत्ये करून मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. सदर महारवतनाची जमीन नियमाकुल करण्यासाठी अधिकारी यांच्यावर दबाव आणून प्लाॅटींग करून अटी व शर्थीचा भंग केला आहे असे असताना ही शासन मूग गिळून गप्प आहे असे गायकवाड यांनी सांगितले.

   माजी आयपीएस अधिकारी विक्रम नरेंद्र बोके आणि उद्योगपती गौतम विनोद हरलालका यांनी महार वतनाची जमीन खोट्या दस्तऐवजाद्वारे बेकायदेशीरपणे बळकावून अधिकाऱ्यांशी संगनमत करून परवानगीचे आदेश मिळवून कायद्याला काळीमा फासल्याने संबधित जमीन तातडीने सरकारजमा करावी अशी मागणी विजय गायकवाड यांनी केली आहे.     जिल्हाधिकारी पुणे यांनी बोके व हरलालका यांना जमीन विकसनासाठी  ना हरकत प्रमाणपत्र दिले असून ते रद्द करण्याची मागणी करूनही दखल घेतली जात नाही.महार वतनाची जमीन असताना व अटी,शर्थीचा भंग झालेला असुनही प्रशासनाने दखल घेतली नाही.

      खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी मागील वर्षी सदर प्रकरणी अधिवेशनात लक्षवेधीची सुचना दिली,म्हणून विक्रम बोके यांनी त्यांना फोन करून दबाव आणल्याने आमदार बाबाजी काळे यांनी मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे लेखी तक्रार केली होती असे गायकवाड यांनी नमुद केले आहे.     जिल्हाधिकारी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका यांनी विकसनासाठी दिलेल्या परवानग्या, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १५५ चा गैरवापर करून सात बारा उताऱ्यावरून कमी केलेले क्षेत्र,उपअधिक्षक भुमी-अभिलेख हवेली यांनी केलेली बेकायदेशीर फाळणी,तसेच बोके व हरलालका यांनी महारवतनाची जमीन विकसित करीत असताना बेकायदेशीरपणे ताबा घेतला, मोबदला न देता फसवणूक करून मोठा गृहप्रकल्प उभारून शासनाचे सर्व नियमांना हरताळ फासल्याने त्यांच्याविरुद्ध  मुख्यमंत्री,लोकायुक्त,महसुमंत्री,नगरविकास मंत्री,अनुसुचित जाती जमाती आयोग यांच्याकडे केलेल्या तक्रारींची दखल न घेतल्याने आझाद मैदान मुंबई येथे न्याय मिळेपर्यंत  उपोषण करणार असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com