Top Post Ad

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथून पहिली 'डबल स्टॅक कंटेनर रेक' रवाना*

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला 'वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर'ची जोडणी कार्यान्वित झाल्यानंतर एका ऐतिहासिक टप्प्यावर, मुंबई विभागातून 'डबल स्टॅक कंटेनर'ची पहिली रेक दिनांक २०.०६.२०२६ रोजी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथून पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील संजान स्थानकाद्वारे सेवा पुरवल्या जाणाऱ्या 'संजान गति शक्ती मल्टी-मोडल टर्मिनल'साठी रवाना करण्यात आली.   ४५ बीएलसीएम ए/बी वॅगन्सची (बोगी लो प्लॅटफॉर्म कंटेनर मॉडिफाइड फ्लॅट वॅगन) ही रेक दिनांक २०.०६.२०२६ रोजी लोड करण्यात आली आणि दिनांक २१.०६.२०२६ रोजी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथून रवाना झाली. या रेकवर एकूण १८० टीइयुएस आणि २५४४.०७ टन वजनाचा माल लोड करण्यात आला होता; या रेकने डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या पश्चिम मार्गावरून २३२ किमीचे अंतर पार पाडले.

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथून डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मार्गे 'डबल स्टॅक'  ऑपरेशन्सच्या सुरुवातीचे प्रतीक म्हणून, वर नमूद केलेल्या रेकव्यतिरिक्त आणखी २ 'डबल स्टॅक कंटेनर' रेक्स दिनांक २०.०६.२०२६ रोजी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथून लोड करण्यात आल्या. १. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते गेटवे डिस्ट्रीपार्क्स लि. गढ़ी हरसरू(गढी हरसारू, दिल्ली विभाग):  २. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते कॉनकॉर गती शक्ती मल्टी-मोडल कार्गो टर्मिनल (छोटा उदेपूर, वडोदरा विभाग): जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदराच्या टर्मिनल्सवरून थेट वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मार्गे 'डबल स्टॅक कंटेनर' चालवल्यामुळे मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढेल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि बंदरातून माल बाहेर काढण्याची क्षमता वाढेल. लॉजिस्टिक्समध्ये सुधारणा, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करणे आणि 'नॅशनल रेल प्लॅन' व 'पीएम गति शक्ती'ची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. 

सदर प्रसिद्धीपत्रक डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com