Top Post Ad

शिस्तबद्ध गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी 'BackToSIP' मोहीम सुरू

: कॅनरा रोबेको अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने (कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाची गुंतवणूक व्यवस्थापक) या भारतातील दुसऱ्या सर्वात जुन्‍या म्युच्युअल फंड कंपनीने सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (एसआयपी) माध्यमातून शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीला चालना देण्यासाठी '#BackToSIP' मोहीम सुरू केली आहे.


ही मोहीम प्रामुख्याने गुंतवणूदारांना त्यांच्या थांबवलेल्या एसआयपी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करण्यावर केंद्रित आहे, ज्‍यामुळे त्यांना त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यास मदत होईल. '#BackToSIP' ही मोहीम एका साध्या पण महत्त्वाच्या विचारावर आधारित आहे, ते म्‍हणजे एखादी एसआयपी थांबते, तेव्हा तिच्याशी जुडलेली स्वप्नेही थांबतात आणि एसआयपी पुन्हा सुरू होते, तेव्हा स्वप्नेही आपला प्रवास पुन्हा सुरू करतात. ही मोहीम दीर्घकालीन आर्थिक नियोजनामध्ये सातत्य आणि शिस्तीच्या भूमिकेवर प्रकाश टाकते.

गुंतवणूकदारांना सहज समजेल आणि स्वतःशी जोडता येईल अशा पद्धतीने, स्वतःचे घर घेणे, मुलांच्या शिक्षणाचे नियोजन करणे, कार खरेदी करणे, भविष्यातील प्रवासाचे बेत आखणे आणि इतर जीवनशैलीच्या निवडी यांसारख्या सामान्यतः समजल्या जाणाऱ्या महत्त्वाकांक्षांशी एसआयपीचा संबंध जोडणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

या मोहिमेची जाहिरात व्हॉट्सअॅप, सोशल मीडिया, ईमेलर्स आणि परफॉर्मन्स मार्केटिंग कॅम्पेन्ससह विविध माध्यमांद्वारे व्‍यक्तींपर्यंत पोहोचवण्याचे नियोजित आहे.

या जाहिरातीमधील संदेश रूपकात्मक पद्धतीने दाखवतो की, एसआयपीमधील गुंतवणूक थांबते, तेव्हा स्वप्नांकडे होणारी प्रगती देखील थांबू शकते आणि एसआयपी पुन्हा सुरू होते, तेव्हा तो प्रवास पुढे सुरू राहतो. थांबलेले उत्सव किंवा आनंदमय क्षण पुन्हा प्रत्‍यक्षात येताना दाखवून ही जाहिरात एसआयपीचे थांबणे आणि त्यानंतर पुन्हा सुरू होणे दृश्य स्वरूपात सादर करते.

बाजारातील चढ-उतारांचा विचार न करता दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीची सवय लावणे हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे. बाजार अस्थिर असू शकतो, पण स्वप्ने थांबायला नकोत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com