Top Post Ad

मुंबईतील मलनिःसारण नियोजनसाठी सल्लागाराची नेमणूक

 मुंबईतील नागरिकांना १०० टक्के मलनिःसारण वाहिनीचे जाळे पुरवण्यासाठी महापालिकेने ठोस कार्यक्रम आखला असल्याची माहिती मिळत आहे.   सध्या मुंबईत महानगरपालिकेने २०८०.२७कि.मी. मलनिःसारण वाहिनीचे जाळे टाकलेले असून हे जाळे संपूर्ण मुंबईच्या ८५.७४ टक्के क्षेत्र आणि ८१.२८ टक्के लोकसंख्येला सेवा देते. मलनिःसारण प्रकल्प विभागाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मलनिःसारण वाहिनी नसलेल्या भागात मलनिःसारण वाहिनी टाकणे व पुरविणे. परंतु मुंबईची भिन्न भौगोलिक स्थिती, भूगर्भीय स्तरातील अनिश्चितता, म्हाडाच्या वसाहती, उपलब्ध तांत्रिक कर्मचारी आणि माहितीसह मलनिःसारण वाहिनीच्या जाळ्यांची रचना करणे आणि टाकणे कठीण आहे. काही वेळा सीआरझेड तथा वन विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्या मालकीच्या जमिनी किंवा महसूल विभागाच्या मालकीच्या जमिनींमध्ये मलनिःसारण वाहिनी टाकणे आवश्यक असते.  मात्र आता  मुंबईच्या हद्दीतील कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे टाकण्यासाठी व मलजल प्रक्रिया केंद्राची संकल्प चित्रे बनवणे आणि सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याकरिता सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी १२ सल्लागारांचे पॅनल तयार करण्यात आले आहे.   

एमसीझेडएमए,वन विभाग, एमओईएफ इत्यादींकडून विशिष्ट ना-हरकत प्रमाणपत्र आणि विविध सरकारी विभाग यांच्याकडुन मंजुरी घेणे आवश्यक असते, ज्यासाठी सल्लागारा नियुक्ती करणे आवश्यक असते, असे मत विभागाकडून व्यक्त करण्यात आले आहे. मलनिःसारण प्रकल्प विभागात, विविध तलावांचे पुनरुज्जीवन, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील म्हाडा वसाहतींच्या सुधारित मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे यासारख्या सल्लागार सेवा पुरविण्याच्या कामांसाठी सल्लागारांच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या आणि गोराई मनोरी बेटावर मलनिःसारण वाहिनीचे जाळ्यासह मलजल प्रक्रिया केंद्राचे नियोजन आणि बांधकाम करण्याकरिता निविदा मागवून सल्लागार कंपनीची निवड करण्यात आली आहे.मुंबईच्या हद्दीतील मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे टाकण्यासाठी व मलजल प्रक्रिया केंद्राची संकल्प चित्रे बनविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याकरिता सल्लागाराची नेमणूक करून सल्लागारांची यादी तयार करुन ३ वर्षाच्या कालावधीकरिता नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी अनुभवी सल्लागारांचे पॅनल तयार करून त्यांच्याकडून सेवा घेण्यात येत आहे.

पॅनल मधील सल्लागार सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार सेवा पुरविणे. यासह सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पांसह पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आर्थिक आणि कायदेशीर सहाय्यासह आणि पर्यायी महसूल स्त्रोतांसह तांत्रिक व्यवहार सल्लागार सेवा आणि बोली प्रक्रिया व्यवस्थापन सेवा प्रदान करणे.  प्रकल्प अंमलबजावणी कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पांसाठी तटस्थ अभियंता / प्राधिकृत अभियंता म्हणून काम करणे, मुंबई महानगरपालिका अनुदानित प्रकल्पांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि तांत्रिक लेखा परीक्षक म्हणून काम करणे. प्रचालने आणि देखरेख कालावधीत पर्यवेक्षण, देखरेख करणे आदी सेवा पुरवणार आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com