Top Post Ad

राममंदिरातील दान... जवळपास २०० कोटी लंपास... म्हणा जयश्रीराम

अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर हे करोडो भारतीयांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. पण याच केंद्रात सामान्य भक्तांच्या श्रद्धेची थट्टा केली जात आहे. कारण सामान्य भक्तांनी मोठ्या श्रद्धेने दिलेल्या दानातील जवळपास २०० कोटी लंपास केले गेले आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी केले आहे. जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भाविकांनी प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण केलेले दान नेमके कुठे गेले, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. लाखो भक्तांनी आस्थेने दिलेला निधी जर देवापर्यंत पोहोचत नसेल, तर हा केवळ आर्थिक घोटाळा नसून भक्तांच्या श्रद्धेची फसवणूक आहे. 

पुढे ते म्हणाले की, अशाचप्रकारे महाराष्ट्रातील अनेक हिंदू देवस्थानांच्या जमिनी बेकायदेशीरपणे हडप करण्यात आल्या आहेत. या जमिनीच्या चोरीला संरक्षण देणारा कायदा आणण्यापूर्वी त्या जमिनी मूळ देवस्थानांना परत मिळाल्या पाहिजेत, हीच न्याय्य भूमिका आहे तसेच धर्म, देव आणि श्रद्धा ही राजकारणाची साधने नसून समाजाच्या विश्वासाचा पाया आहेत. त्यामुळे किमान देवाच्या दरबारात तरी संपूर्ण पारदर्शकता असली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी केली.
अयोध्येतील राम मंदिरात अर्पण केलेल्या देणग्यांच्या चोरीच्या आरोपांमुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे. वाद वाढल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने तीन सदस्यांचे SIT स्थापन केले. तपासादरम्यान एका कर्मचाऱ्याच्या घरी शेणात लपवलेले 10 लाख रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणाची दखल घेत पंतप्रधान कार्यालयानेही स्पष्टीकरण मागितले. 

अयोध्या येथील श्री रामजन्मभूमीमधील रामलल्लांच्या दरबारात कथित दान चोरीच्या प्रकरणात आता एक नवीन वळण आले आहे. राम मंदिर आंदोलनात सक्रिय भूमिका बजावलेल्या संतोष दुबे यांनी आज पोलीस ठाण्यात हजेरी लावली. रामजन्मभूमी येथे एक लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे, ज्यामध्ये राम मंदिर ट्रस्टच्या अनेक अधिकाऱ्यांची नावे आहेत. स्थानिक पत्रकारांशी बोलताना संतोष दुबे यांनी सांगितले .  प्रभू रामांची दानपेटी असलेल्या श्रीरामजन्मभूमीतील दानपेटीत झालेली चोरी ही अनेकशे कोटी रुपयांची बाब होती,  ट्रस्ट म्हणजे १२-१४ लोकांचा एक टोळी आहे,  रामाच्या नावाखाली लूटमार करीत आहेत. या  लोकांमध्ये चंपत राय बन्सल, अनिल मिश्रा यांचा समावेश आहे. गोपाल राव आणि त्यांचा ड्रायव्हर, टिन्नू, जो राम शंकर यादव म्हणूनही ओळखला जातो, हे गरीब लोक होते. ते इतके मोठे प्रख्यात व्यक्ती कसे बनले? मी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.   एसआयटीने देशभरात हजारो तपास केले आहेत, पण काहीही निष्पन्न झाले नाही. आमचा यावर विश्वास नाही. एसआयटी, सीबीआय, आयबी… ते काहीच करत नाहीत; सर्व काही सांभाळून घेतले जाते. प्रत्येकजण दबावाखाली आहे.

 रामजन्मभूमी स्थळावरील कामगार म्हणाले, "हे नियमितपणे घडत आले आहे; यात काही नवीन नाही. तुम्हाला आधीच माहीत आहे की, इथे असे घाणेरडे काम करणारे अनेक लोक आहेत. टिन्नू यादव आहे, चंपत राय आहे; हेच लोक यात सामील आहेत." त्यामुळे हे प्रकरण हळूहळू चिघळले. महिपाल सिंग यात सामील झाले, ब्रिजभूषण सिंग यांचा जबाब समोर आला  म्हणून आज आम्ही एक निवेदन दाखल केले आहे की या प्रकरणात एसआयटीची गरज नाही, कारण हे चौघेही गुन्हेगार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com