छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जूनला ३५० वा आणि ३५१ वा राज्याभिषेक सोहळा रायगडावर महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणात साजरा केला. यंदा मात्र मनोहर भिडेनी ६ जूनला राज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करून म्हटले की, ६ जूनचा राज्यभिषेक हा इंग्रजी कैलेंडरनुसार असून आपण केवळ हिंदू पंचांगातील तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीलाच साजरा केला पाहिजे. ताकाला जाऊन मोगा दढविणारे भिडे तारीख नाकारून तिथी नुसार साजरा करण्यास सांगत असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ जून १६७४ चा राज्यभिषेक नाकारून २४ सप्टेंबर १६७४ रोजी दुसरा शाक्त पंथी राज्याभिषेक करून घेतला. हे का सांगत नाहीत. अपशकून झाला. म्हणून दुसरा राज्यभिषेक केला. त्याचे समर्थन न करता अपशकूनी राज्यभिषेक सोहळा साजरा करून आपले ब्राह्मणी वर्चस्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु विज्ञानवादी बहुजन तरुण पहिला राज्यभिषेक नाकारून दुसरा शक्तपंथी राज्यभिषेक का केला याचा शोध घेत आहे.
शिवाजी महाराज राजा असूनही अष्टप्रधान मंडळातील मोरोपंत पिंगळे सारखे ब्राह्मण शिवाजी महाराजांना शूद्रराजा मानून त्यांच्या पगतीला देखील बसत नव्हते. कारण ब्राह्मण परशुरामाने क्षत्रियांचा २१ वेळा निःपात केल्यामुळे पृथ्वीवर कोणी क्षत्रिय राहिलेला नाही धर्मशास्त्र नुसार ब्राह्मण किती ही झाला भ्रष्ट तरी ही तिन्ही लोकी श्रेष्ठ! त्यामुळे गुन्हेगार असला तरी त्याला शासन करता येत नव्हते. म्हणून शिवाजी महाराज अवबाजी आवळे, जिजाऊ आणि संभाजी राजे यांनी राज्य कायदेशीर राज्यसंस्था धर्मसिद्दी, प्राणप्रतिष्ठा, स्वातंत्र्य आणि सार्वभौम राज्यसाठी राज्याभिषेक करायचा निर्णय घेतला. काशीच्या गागाभटा कडून राज्यभिषेक करून घेताना दानरूपी स्वराज्याची तिजोरी खाली केली. तरीही जातीवर गेलेल्या गागाभटाने क्षत्रिय राजासाठीचे वेदोयुक्त मंत्र न म्हणता शूद्र राजासाठी पुराणयुक्त मंत्र म्हणत शिवराय यांचा शूद्रराजा म्हणून राज्यभिषेक केला.हा अवमान सहन न झाल्याने राजमाता जिजाऊ रायगड वरून थेट पाचवडला आल्या. आजारी पडलेल्या जिजाऊनी राजसत्ता इतकीच धर्मसत्ता महत्वाची असल्याचे शिवबा ना म्हणत अखेरचा प्राण सोडला. आऊसाहेबांचाशब्द अंतिम मानून शिवाजी महाराजानी केवळ ७९ दिवसांत शालिवान शक १५९६ शुध्द आश्विन पंचमीला गुरुवार दिनांक २४ सप्टेंबर १९७४ रोजी शाक्तपंथी म्हणजेच तांत्रिक पद्धतीचा राज्याभिषेक निश्वलपुरीचे गोसावी अर्थात बौध्द भिक्षु यांच्याकडून करून घेतला. तांत्रिक ख्दाचा अर्थ विशिष्ट शिद्दांत शास्त्र संप्रदाय होय, सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य आणि विक्रमादित्य यानी देखील राज्याभिषेक प्रसंगी गणराज्यात जातीच्या उच्चाटनासाठी खालच्या जातीच्या महिले सोबत विवाह केला.
दुसरा राज्याभिषेक वेळी शिवाजी महाराजानी देखील वेरूळच्या अस्पृश्य महिलेशी विवाह केल्याची इतिहासात नोंद आहे. शिवाजी महाराजांनी १६ व्या शतकात केलेली ही मोठी क्रांती आहे. संस्कृत पंडित शंभूराजे धर्म पंडितांच्या चुका दाखवत असल्याने धर्म पंडित भट ब्राह्मण पुरोहित यांची मोठी पंचायत होत होती. म्हणून त्यांना बदनाम करून स्वराज्यात बुद्धिभेद करीत पेशवाई आणली. त्या पेशव्याला शिवशाही बदल आदर असता तर शिव राज्याभिषेकाचा शक बंद करून मोगलांचा फसली शक सुरू केला नसता. महात्मा फुलेनी अडगळीत पडलेल्या शिवशाहीला न्याय देण्यासाठी रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधून प्रथम शिवजयंती सुरू केली. शिवराज्याभिषेकाला न्याय मिळवून देण्यासाठी २४ सप्टेंबर १८७३ रोजीच सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याचा मुख्य उद्देश जातीभेद, अंधश्रद्धा, आणि सामाजिक अन्यायांविरुद्ध लढा देऊन एक समतावादी समाज घडविणे. परंतु ब्राह्मण आणि देव धर्म अधीन असलेल्या मराठे मावळे यांनी महात्मा फुलेच्या सत्यशोधक चळवळीला कधीच साथ दिली नाही. आणि देण्याच्या आजही मानसिकतेचे नसल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची आणि पुतळ्याची विटंबना सुरू आहे.
पर्यटनासाठी अनमोल ठेवा असलेले ३५० गहकिल्ले यांची जाणीव पूर्वक पडझड सुरू आहे. कारण प्रत्येक गड किल्ले यांच्या पायथ्याला जगाचे आठवे आवर्य असलेली अनमोल बौद्ध लेणी आहेत. सह्याद्री पठारावरील ही ८०० बौद्ध लेणी आणि शिवाजी महाराजांचे ३५० गडकिल्ले पर्यटनासाठी खुले केले तर महाराष्ट्र सरकारला जगातून मोठा आर्थिक निधी मिळू शकतो. त्यासाठी शिवराय आणि भीमराय यांच्या विचाराचे सरकार सत्तेत येण्याची गरज आहे. शिवराज्याभिषेक अवमानच मूळ मनुस्मृतीत असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड पायथा महाड येथे २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे दहन करून शिवरायांच्या अवमानाचा बदला घेतला. हे मराठे मावळे यांच्या लक्षात कधी येणार आहे.? भीमसैनिक २४ सप्टेंबरचा दुसरा शक्तपंथी राज्यभिषेक सोहळा साजरा करून शिवशाहीला न्याय देत आहेत.
मनोहर भिडे मात्र तारखेचा आणि तिथीचा वाद निर्माण करून बहुजन समाजाचा बुद्धिभेद करीत आहेत. त्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यभिषेक प्रसंगी ३२ मन सोन्याचे सिंहासन ची प्रतिकृती तयार करण्यासाठी महाराष्ट्रातून निधी गोळा केला त्याचे काय झाले याचे अगोदर उतर दिले पाहिजे. कारण पुरोगामी महाराष्ट्रातील बहुजन तरुणांना आता मूर्ख बनविणे तेवढे सोपे नाही. महाराष्ट्राचे पुरोगामित्व टिकविण्यासाठी आणि शिवशाहीला न्याय देण्यासाठी पुरोगामी संघटनांनी कोल्हापुरात मे २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान परिषद स्थापन केली आहे. त्यातून शिवशक्ती आणि भीमशक्तीचे दर्शन घडले तरच महाराष्ट्राचे पुरोगामित्व टिकणार आहे

0 टिप्पण्या