Top Post Ad

स्वातंत्र्य सेनानी अण्णासाहेब चुडामण पाटील यांच्या जीवनकार्यावर आधारित 'अजिंक्य' ग्रंथाचे प्रकाशन

स्वातंत्र्य संग्राम, सहकार, शिक्षण, समाजकारण आणि जनसेवा या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणारे स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार कै. अण्णासाहेब चुडामण पाटील यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित 'अजिंक्य' या चरित्रग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळा शुक्रवार, दि. १२ जून  रोजी दुपारी १२ वाजता टाटा थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉइंट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. या प्रसंगी प‌द्मभूषण अनुपम खेर (ज्येष्ठ अभिनेते, माजी अध्यक्ष, एफटीआयआय) तसेच प्रख्यात दिग्दर्शक व लेखक सौरभ शुक्ला हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री ना. गिरीश महाजन, माजी मंत्री आ. अमरीशभाई पटेल, पाणीपुरवठा व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल, मंत्री ना. आशिष शेलार, ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, वस्रो‌द्योग मंत्री ना. संजय सावकारे, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे तसेच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ यांची उपस्थिती लाभणार आहे.

कै. अण्णासाहेब चुडामण पाटील यांनी स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग, ग्रामीण विकास, शिक्षण प्रसार, सहकार क्षेत्राची उभारणी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी केलेला संघर्ष यामुळे खानदेशासह महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने 'अजिंक्य हा चरित्रग्रंथ निर्माण करण्यात आला आहे. ग्रंथामध्ये अण्णासाहेबांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील योगदानाचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील नेतृत्वगुण, तत्त्वनिष्ठा, संघर्षशीलता आणि जनसेवेची भूमिका नव्या पिढीसमोर मांडण्यात आली आहे.

या सोहळ्यास राज्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, उद्‌द्योगक्षेत्रातील प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज आणि अण्णासाहेबांचे असंख्य अनुयायी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमामुळे अण्णासाहेबांच्या कार्याचा गौरव होण्याबरोबरच समाजाला प्रेरणा देणाऱ्या नेतृत्वाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे. श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था, धुळे यांच्या वतीने आयोजित या प्रकाशन सोहळ्यास सर्व नागरिक, साहित्यप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि अण्णासाहेबांच्या कार्याचे अभ्यासक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक विनय रोहिदास पाटील व कुणाल रोहिदास पाटील यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com