Top Post Ad

M FILES' मुळे 'तो माणूस' अमेरिकेच्या तालावर नाचत आहे ; ॲड. प्रकाश आंबेडकर

 अमेरिकेकडे असलेल्या काही गुप्त फाईल्स आणि त्याद्वारे भारताच्या सार्वभौमत्वाला लागलेली खीळ आता एका मोठ्या वास्तवाच्या रूपाने समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या आंतरराष्ट्रीय वास्तवाचा पर्दाफाश केला आहे. कोणत्याही व्यक्तीचे थेट नाव घेतलेले नाही, त्यामुळे हा इशारा नेमका कोणाकडे आहे. याची चर्चा होताना दिसत आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेल्या या वास्तवानुसार, अमेरिकेकडे 'M FILES' नावाचे अत्यंत संवेदनशील दस्तऐवज आहेत. या संदर्भात त्यांनी लिहिले आहे की, "M FILES! ज्यामध्ये अनेक प्रकारचे रेकॉर्ड केलेले वैयक्तिक रहस्य समाविष्ट आहेत, ते अमेरिकेकडे आहेत! आणि म्हणूनच तो माणूस अमेरिकेच्या तालावर मुजरा करत आहे आणि त्याने भारताला पुन्हा एकदा गुलाम देश बनवले आहे." 

या गंभीर वास्तवामुळे देशाच्या राजकीय आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमेरिकेकडे असलेल्या वैयक्तिक गुप्त माहितीच्या (M - FILES) दबावाखाली येऊन 'तो माणूस' अमेरिकेच्या इशाऱ्यावर काम करत असून, यामुळे भारताचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे आणि देश पुन्हा एकदा गुलामगिरीच्या उंबरठ्यावर उभा राहिला आहे, हेच या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com