नेर परसोपंत( प्रतिनिधी) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जगाने मान्य केलेले ज्ञानाचे प्रतीक अशा बाबासाहेबांची एसटी एसटी ओबीसी हे तीन प्रवर्ग अपत्य आहे या अपत्यांनी वर्तमान परिस्थितीत एकजुटीने राहा असे भावनिक आवाहनओबीसी जनमोर्चा, चे सत्यशोधक डॉ. विलास काळे यांनी केले. ते लोकराजा राजर्षी शाहु महाराज यांचा जयंती निमित्ताने आयोजित परीसंवादात प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. जगदीश पाटील होते व वक्ते प्राचार्य ना.उ.धांदे, राजेंद्र कांबळे यवतमाळ,प्रा.मनोहर देशमुख,वासेजी यवतमाळ , वनिता इंगोले (मोरे )अरुणा इंगोले होते
स्थानिक नालंदा नगर मधील नालंदा बुद्ध विहार मध्ये आयोजित या परिसंवादात बोलताना काळे पुढे म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जगाने मान्य केलेले ज्ञानाचे प्रतिक अश्या या विद्वान महापुरुषाने देशातील 6,647 जातींना एकत्रित करून ओबीसी, एस सी,एस टी ही तीन अपत्य जन्मास घातले बाबासाहेबांनी ही मेहनत घेतली ही मेहनत विफल व्हावी आणि एसटी एससी ओबीसी मध्ये भांडणे लागावे यासाठी वर्तमान परिस्थितीमध्ये सरकार द्वारा प्रयत्न केल्या जात आहे या कट कारस्थानाला बळी न पडता बाबासाहेबाचे अपत्य एस सी एस टी ओबीसी यांनी एकत्रित राहून संघर्ष करावा असे भावनिक आव्हान सत्यशोधक डॉ.विलास काळे यांनी केले तर जे सरकार आमचे हक्क अधिकार आणि स्वाभिमान नाकारतात अशा देशात न राहता स्वतंत्र देशाची मागणी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. जगदीश पाटील यांनी केली
प्रज्ञाशोध: आंबेडकरी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी विचार मंच व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन मंडळ नालंदा नगर नेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे संचालन नानाजी ढबाले प्रास्तावित डॉ. शरद मोरे आभार प्रदर्शन अशोक गणवीर यांनी केले
कार्यक्रमाला प्रवीण रामटेके पत्रकार उमेश इंगोले पत्रकार पंकज गुल्हाने पत्रकार रजा शेख पत्रकार शोभा इंगोले माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर प्रभाकर मेश्राम अरविंद कुळमेथे सुरेश चौधरी किशोर अगम मिलिंद जामनकर दिनकर इंगोले शीला मिसळे सुषमा काळे वर्षा अगम तनुजा ढबाले आशा अगम शशिकला इंगोले विद्या चौधरी वृषभ मेश्राम अनामिया फिरदोस आदींसह परिसरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. अशी माहिती डॉ शरद मोरे यांनी दिली

0 टिप्पण्या