Top Post Ad

ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी धर्माचा वापर करतात

भाजपा व RSSचे हिंदू धर्माशी काहीही देणेघेणे नाही, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ते धर्माचा वापर करत असून त्यांचा एकच राम आहे आणि तो म्हणजे नथुराम, प्रभुरामाशी त्यांचे काहीही देणेघेणे नाही. रामभक्तांनी प्रभू रामाला भक्तीभावाने पैसे, सोने, चांदी दान केले, त्यावर भाजपा आरएसएसच्या लोकांनी दरोडा टाकला आहे. प्रभूरामाच्या नावावर कोट्यवधींची चोरी करून श्रद्धेशी खेळ केला आहे, या चोरीची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करून चोरांना कठोर  शिक्षा झाली पाहिजे व राम मंदिर ट्रस्ट बरखास्त करा, अशी मागणी काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी केली आहे.


राजीव गांधी भवन येथे विशेष पत्रकार परिषेदत बोलताना कन्हैयाकुमार पुढे म्हणाले की, प्रभू रामाच्या मंदिरातील चोरी महापाप व गंभीर गुन्हा आहे, आम्ही धर्माच्या नावावर राजकारण करणार नाही पण हा कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धेच्या प्रश्न आहे. राम मंदिरात चोरी करूनही भाजपा आरएसएसचे नेते अत्यंत निर्लज्जपणे चोरीचे समर्थन करत आहेत. दान देऊन विसरा, रामधनावर कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही, हिंदूचे दान आहे हिंदूंनी घेतले, अशी बेताल वक्तव्य करत आहेत. ‘राम को लाये है’ म्हणण्याची हिम्मतच कशी होते. प्रभूरामाला काय भाजपाने आणले आहे का, ते तर हजारो वर्षांपूर्वीच आले आहेत. गांधी हत्येनंतर आरएसएसने नथुरामशी काही संबंध नाही म्हणत हात वर केले आता राम मंदिरातील चोरी पकडली की रा. स्व. संघाने चंपत राय यांच्यापासून हात झटकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर पायाभरणी समारंभ व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मोठा गाजावाजा केला, श्रेय घेण्यासाठी सर्वात पुढे होते पण आता चोरी उघड झाली तर एक शब्द काढत नाहीत. ५६ इंच छातीच्या मोदींची २.५ इंच जीभ हलली नाही. पेपर लिक झाले तरी मोदी गप्प, राम मंदिरात चोरी झाली तरीही मोदी गप्पच आहेत.

राम मंदिरातील चोरी प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीवर कोणाचाही विश्वास नाही. कारण ही एसआयटी धुळफेक आहे. एसआयटी प्रमुखावर ४२० चा गुन्हा दाखल झालेला आहे, तो काय चोरी पकडणार आहे. एसआयटी चौकशीच संशयास्पद आहे. चौकीदारच चोराला सामिल झालेला आहे तर मग चोर कसा पकडला जाणार म्हणून सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा व सर्व दोषींना पकडा. पैसे मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांना पकडले जात असून मोठे मासे मात्र मोकाट आहेत, असेही कन्हैयाकुमार म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना कन्हैयाकुमार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे कोणतेही राजकीय अस्तित्व नाही, ते अमित शाह यांना सरेंडर झालेले आहेत. चंदा दो, धंदा लो, मॉडेल वर त्यांचे राजकारण सुरु आहे. अमित शाह, अदानी विरोधात बोलण्याची हिम्मत शिंदेंनी दाखवावी. सरेंडर करणारे काही पक्ष एका आघाडीत तर देशासाठी लढणारे पक्ष दुसऱ्या आघाडीत आहेत. देशाचा स्वाभिमान, लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी लढणारी वेगळी आघाडी आहे. काँग्रेस देशहितासाठी लढत आहे. या लढ्यात जे येतील त्यांना सोबत घेऊन काँग्रेसची लढाई सुरु आहे असेही कन्हैयाकुमार म्हणाले.

इंग्रजांनी बांधलेले पुल दीड दोनशे वर्षानंतरही अजून भक्कम आहेत. काँग्रेस सरकारने १६ वर्षांपूर्वी बांधलेला वांद्रे वरळी सी लिंकसुद्धा आजही मजबूत आहे पण दोन महिन्यापूर्वी बांधलेला ७ हजार कोटी रुपयांचा मिसिंग लिंक मात्र मिसिंग आहे, असेही कन्हैयाकुमार म्हणाले.. या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस, प्रवक्ते शितल म्हात्रे, रवी बावकर, निजामुद्दीन रायन, मंदार पवार, इत्यादी उपस्थित होते.  


मशहूर इतिहासकार डॉ रुचिका शर्मा ने बताया कि राम मंदिर की चोरी कोई नई बात नहीं है, भारत के कई मंदिरों को स्वयं हिन्दुओं ने ही लूटा है  उन्होंने ज़िक्र किया कि 11वीं सेंचुरी राजा हर्ष ने खूब लूटपाट मचाई, 9वीं सेंचुरी में भी शंकर वर्मन ने 64 मंदिर लुटे, 18वीं सेंचुरी में परशुराम भाऊ ने श्रृंगेरी के शारदा मंदिर को लूटा 60 लाख की लूट,  उन्होंने आगे बताया कि गजनी से पहले कई बार हिंदुओं ने सोमनाथ को लूटा, कईयों ने तो मूर्तियों का अनादर भी किया, मंदिरों को भी तुड़वाया गया, मंदिर हमेशा से बिजनेस का अड्डा रहा है, रुचिका शर्मा ने ऐतिहासिक तथ्यों के आधार पर मनुवादियों की लंका लगा दी है 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com