रहिवाशांना पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून वीजपुरवठा तोडण्याची धमकी दिल्याचाही आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी महापालिका व पोलिसांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. २०२५ आणि २०२६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचेही ठाकूर यांनी नमूद केले. १८ ऑगस्ट २०२६ रोजी महापालिका मुख्यालयात पत्र देऊनही अपेक्षित दखल घेतली नसल्याचा दावा ठाकूर यांनी केला. पाडकामासंदर्भातील महापालिकेच्या परवानग्या, कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करून कारवाई थांबवावी, अशी मागणी करत महापालिका आयुक्त, मुंबई पोलीस आयुक्त आणि मुख्य सचिवांच्या प्रतिनिधींची तातडीने बैठक घेऊन रहिवाशांच्या प्रश्नावर तोडगा काढावा, पुनर्वसनासाठी अत्यल्प क्षेत्रफळाच्या घरांचा प्रस्ताव असल्याचा आरोप करत, वांद्रेसारख्या परिसरात रहिवाशांना किमान ५०० ते ५५० चौरस फुटांची घरे मिळावीत, मागील 29 वर्षापासून या रहिवांशांची परवड होत असून त्यांना त्वरीत न्याय मिळावा अशी मागणी ॲड. ठाकूर यांनी केली.


0 टिप्पण्या