पालघर जिल्ह्यातील १० वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी विशेष पथकामार्फत सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करण्यात यावा, अशी मागणी मुलीच्या आईच्या वतीने ॲड. शिवराम भोसले उर्फ साजिदा सरफराज अंसारी यांनी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (डीजीपी), कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच पालघर पोलिसांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी तसेच त्याच्या कथित मदतनीसांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणीही पत्रकार परिषदेत करण्यात आली. तसेच प्रकरणाचा तपास स्थानिक पातळीपुरता मर्यादित न ठेवता विशेष पथकामार्फत करण्यात यावा, अशी भूमिका मुलीच्या आईने मांडली आहे. याबाबत आज प्रसारमाध्यमांशी मुंबई प्रेस क्लब येथे संवाद साधण्यात आला.
दरम्यान, पालघर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे (LCB) सोपविण्यात आल्याची माहिती दिली आहे. मात्र, तपासाच्या सद्यस्थितीबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. अल्पवयीन मुलीची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी तिचे नाव, शाळेची माहिती आणि इतर वैयक्तिक तपशील पूर्णपणे गोपनीय ठेवावेत, . तसेच प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत मुलीला आवश्यक पोलीस संरक्षण देऊन तिच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.प्रकरणाचा जलदगतीने निपटारा व्हावा यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून सहा ते आठ महिन्यांत निकाल देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया वर्षानुवर्षे प्रलंबित राहू नये, अशी अपेक्षा मुलीच्या आईच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या या प्रकरणी तातडीने कार्यवाही न झाल्यास मंत्रालयासमोर भूख हडताल करण्याचा इशारा मुलीच्या आईने दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीस प्रशासन पुढील कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
१४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांच्याकडे सविस्तर तक्रार करून आपल्या १० वर्षीय मुलीने कथित अत्याचाराबाबत ४ ऑगस्ट रोजी माहिती दिल्याचे नमूद केले होते. त्यानंतर पालघर पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तसेच आपत्कालीन ११२ क्रमांकावर संपर्क साधला. या संपकोची CFS38537073 या संदर्भ क्रमांकाने नोंद झाल्याची माहिती देण्यात आलीमुलीची वैद्यकीय तपासणी ग्रामीण रुग्णालय, पालघर येथे झाली. तसेच पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचा आणि मुलीशी कथितरीत्या धमकीच्या स्वरूपात वर्तन करण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर तक्रारदारांनी १९ ऑगस्ट रोजी पोलीस महासंचालकांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी विनंती केली. या पत्रासोबत आधीची तक्रार, ११२ संदर्भ क्रमांक, वैद्यकीय कागदपत्रे तसेच प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या प्रती जोडण्यात आल्या होत्या.. तरीही गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असेल, तर आम्ही न्यायासाठी आणखी कोणाकडे जावे?" असा सवाल मुलीच्या आईने उपस्थित केला आहे.

0 टिप्पण्या