२०२१ मध्ये आलेल्या 'जयंती' या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानं सामाजिक क्षेत्रात मोठी चर्चा घडवली होती. 'जयंती' चित्रपट यशस्वी झाल्यानंतर त्याचा सिक्वल 'जयंती २' हा आगामी मराठी चित्रपट ११ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सिनेगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन शैलेश बळीराम नरवाडे यांचे असून ऋतुराज वानखेडे, पायल जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी आणि देविका दफ्तरदार, विजय निकम, राजकुमार जरांगे, मानसी सुभाष यांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. 'जयंती 2' सिनेमाची निर्मिती मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओनं केली आहे. संजीवकुमार हिल्ली यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून संकलन फैसल महाडिक यांचे आहे. डॉ. सुहास अंबादे , सुहास मुंडे आणि सौरभ गुरु यांनी लिहिलेल्या गीतांना ओंकारस्वररूप यांचे संगीत लाभले असून पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांचे आहे.
आजच्या तरुण पिढीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा पडणारा प्रभाव आणि विचारांमधून समाजात होणारा सकारात्मक बदल यावर भाष्य करणारा 'जयंती' हा चित्रपट 2021 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता. आता तब्बल पाच वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच 'जयंती 2' हा सिनेमा येत्या 11 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. नुकतंच या सिनेमाचे प्रमोशन दादरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे करण्यात आलं. यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.'जयंती' सिनेमाच्या पहिल्या भागाला त्याच्या वेगळ्या विषयामुळे रसिक प्रेक्षकांचा चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. मुख्यतः चित्रपटाचा विषय हा विशेषतः तरुणाईच्या मनाला भिडला होता. त्याच्या मनात असलेली भावना ही चित्रपट माध्यमातून दाखविण्यात आली होती. 'जयंती 2' च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली तेव्हा पासूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. आता 'जयंती 2' मध्ये नक्की काय घडणार? कथानक कोणते रंजक वळण घेणार? यासाठी रसिक प्रेक्षकांना अजून थोडी वाट पहावी लागणार असून मला खात्री आहे की प्रेक्षकांना 'जयंती 2' नक्कीच आवडेल असे चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश नरवाडे यांनी सांगितले.
'जयंती २' येत्या ११ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटाचा नायक संत्या म्हणजेच अभिनेता ऋतुराज वानखेडे याची चित्रपटात मध्यवर्ती भूमिका असून टीझरमध्ये दिसत असलेल्या अभिनेत्रींच्या भूमिकाही चित्रपटात आपली महत्वपूर्ण कामगिरी बजावताना दिसत आहेत. "जयंती २' हा चित्रपट सध्याच्या शिक्षण व्यवस्थेशी संबंधित असेलल्या विषयावर भाष्य करणारा आहे. एका ग्रामीण भागातील विद्यार्थिनीच्या वाट्याला येणारा भेदभाव हा चित्रपटाचा विषय असल्याचं टीजरवरून दिसते.
'जयंती' हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा तरुणांवर पडणारा प्रभाव आणि होणारा सकारात्मक बदल याची गोष्ट चित्रपटात मांडण्यात आली होती. अत्यंत वेगळा विषय आणि नव्या पद्धतीच्या मांडणीमुळे या चित्रपटाची मोठी चर्चा झाली, बॉक्स ऑफिसवरही चित्रपटानं यश पाहिलं होतं. आता त्या पुढे जाऊन सध्या शिक्षण क्षेत्रात अनेक घडामोडी घडत असताना 'जयंती २' हा चित्रपट निश्चितच महत्त्वाचा ठरणार आहे. उत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटाचा टीजर अत्यंत प्रभावी आणि मनाला भिडणारा असा आहे. त्यामुळेच चित्रपटाविषयीची उत्सुकता आता नक्कीच वाढली आहे.

0 टिप्पण्या