Top Post Ad

Nashik मुखेड येथे पर्यावरण संवर्धन सोहळा उत्साहात संपन्न

 नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील मुखेड येथे  पर्यावरण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्यावरण संवर्धन उपक्रमाचा’ लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  छगनराव भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्यावरण संवर्धन उपक्रमाचे अशोक एन. जे. यांच्यासह मुखेड गावचे सरपंच, नाशिक जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी सहकारी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते


मंत्री छगनराव भुजबळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. भारतभर  वृक्षांची लागवड करून संपूर्ण भारत फळाफळांनी समृद्ध करण्याचे ध्येय असून, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. भुजबळ पुढे म्हणाले की, शासनाकडून दरवर्षी पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. मात्र, केवळ शासनाच्या प्रयत्नांवर अवलंबून न राहता समाजातील संस्था, नागरिक आणि युवकांनीही पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. सरकारची वाट न पाहता पर्यावरणासाठी जे कार्य हाती घेतले आहे, त्या कार्याला आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

कार्यक्रमात बोलताना अशोक एन. जे. यांनी वृक्ष आणि युवकांच्या विकासाची सांगड घालत प्रेरणादायी विचार मांडले. ते म्हणाले की, बीजारोपण केल्यानंतर एखाद्या रोपट्याला चार वर्षे सातत्याने खत, पाणी, ऊन, वारा आणि योग्य निगा मिळाली, तर त्याचे रूपांतर एका मोठ्या, सक्षम वृक्षात होते आणि कालांतराने तो वृक्ष फळ देऊ लागतो. त्याचप्रमाणे युवकांनीही आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करून सलग चार वर्षे त्यामध्ये पूर्णपणे लक्ष केंद्रित केले, मेहनत घेतली आणि सातत्य ठेवले, तर ते स्वतःचे अस्तित्व घडवू शकतात आणि भविष्यात समाजाला फलदायी योगदान देऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

‘पर्यावरण संवर्धन उपक्रम’ ही केवळ वृक्षलागवडीची संकल्पना नसून वृक्षांचे संगोपन, पर्यावरण संवर्धन, युवकांचा व्यक्तिमत्त्व विकास आणि भविष्यातील समृद्ध भारताची निर्मिती यांचा संगम असलेली संकल्पना असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले. पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाला युवकांच्या जीवनाशी जोडण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत वृक्षांचे बीजारोपण करून केवळ वृक्ष लागवडीपुरते मर्यादित न राहता, पुढील चार वर्षे त्या वृक्षांची काळजी घेऊन त्यांचे संगोपन करण्यावर भर देण्यात येतो. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com