ती स्वतःला सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना समजते आणि तसे दाखवते सुद्धा परंतु आरएसएस खरेच सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना आहे काय ? जर खोलात जाऊन विचार केला तर असे लक्षात येते की हे ब्राह्मण समाजाचे मुख्य संघटन आहे. हे मुख्य संघटनच नाही तर ते त्यांचें एक खूप मोठे नेटवर्क आहे .भारतातच नाही तर आज जगात त्यांचे हे नेटवर्क पसरलेले आहे आणि हे नेटवर्क इतर कोणत्याही कामासाठी नसून केवळ ब्राह्मण वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आहे . सगळ्या मोठमोठ्या आणि महत्त्वांच्या पदावर ब्राह्मण वर्गाला आरुढ झालेले पाहून सर्वसामान्य माणसाच्या मनात ब्राह्मण समाजाबद्दल सहज आदर निर्माण होतो आणि त्यांना वाटते की ब्राह्मण वर्ग हा फार बुद्धिमान आहे. पण वास्तवात ब्राह्मण समाज हा मुळात बुद्धिमान आणि शूर नाही तर ही एक कुटील आणि डरपोक जमात आहे आणि तसे नसते तर त्यांनी इतक्या वर्षांत भारता व्यतिरिक्त इतर देशातही आपलं जातीवर्चस्व निर्माण केलेले असते पण इतर देशात सामाजिक समानता आणि कायद्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी होत असल्यामुळे ब्राह्मण तिथे अजूनही आपला प्रभाव टाकू शकले नाही . ब्राह्मण खूप हुशार आहेत, बुद्धिमान आहेत ही त्यांची प्रतिमा त्यांनी त्यांच्या नेटवर्कद्वारे निर्माण केलेली प्रतिमा आहे. ब्राह्मण भारतातल्या मोठमोठ्या पदावर याकरिता गेला की त्यांचे भारतभर नेटवर्क आहे हे नेटवर्क कसे काम करते हे आपण पाहू.
शाखेत लहान मुले जातात त्या लहान मुलांना त्यांच्यात भेदभाव न करता त्यांना देशाबद्दल ,देवांबद्दल राष्ट्राबद्दल, व हिंदू धर्माबद्दल मोठमोठ्या गोष्टीचे उदात्तीकरण करून सांगण्यात येते तसेच वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळून त्यांच्यात संघ मैदानाबद्दल आकर्षण आणि आदर निर्माण करण्यात येते. शाखेवर अशा कोणत्याही गोष्टी सांगण्यात येत नाही ज्यामुळे तो बालक दुखावेल . सुरुवातीला बालक शाखेचा नियमित स्वयंसेवक कसा बनेल यावर त्यांचा जास्त भर असतो आणि याकडे पूर्ण लक्ष देण्यात येते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या घरच्या लोकांशी संपर्क साधण्यात येतो त्यांच्याशी मैत्रीचे संबंध जोडण्यात येतात अशा प्रकारे संघटन वाढविण्याची पुरेपूर काळजी घेण्यात येते . संघटनेतून स्वयंसेवक पक्का होतो तेव्हा मात्र मग त्यांना हिंदू धर्माबद्दल अस्तित्वात नसलेल्या गोष्टी सांगून त्यांच्यात फुसका अहंकार भरण्यात येतो व मुसलमानाविरुद्ध विष पेरून त्यांचे डोके तयार करण्यात येते एक प्रकारे ब्राह्मण समाजाच्या हिताकरिता अनुकूल मानसिकता बनविण्याची प्रक्रिया सतत चालत असते.
माणसाच्या मेंदूचे एक वैशिष्ट्य आहे की तो जे विचार जे साहित्य लोकांकडून स्वीकारतो, ग्रहण करतो तेच तो नंतर समाजाला देत असतो एकदा त्याच्या मनात काही गोष्टींनी पक्के घर केले की मग याचा सारासार विवेक संपतो त्याला इतरांनी कितीही समजावून सांगितले की हे बरोबर नाही तरी तो आपल्या मनाचेच स्वीकारतो व तसाच वागतो म्हणजे एक प्रकारे इथल्या माणसाची लहानपणापासून मानसिकता घडविण्याचे काम हे संघटन करते. पण त्यातही तो एक काळजी सतत घेत असतो की संघटनेच्या इनरकोरपर्यंत कट्टर ब्राह्मणाशिवाय इतर कोणत्याही जातीच्या सेवकांचा प्रवेश होऊ नये , नरेंद्र मोदींनी आपले संपूर्ण जीवन या संघटनेसाठी घालवले तरीपण त्याला त्यांच्या इनरकोरमध्ये येऊ दिल्या गेले नाही उलट जास्त प्रभावी झाल्यामुळे त्याला राजकीय क्षेत्रात पाठवून दिले कारण त्यांच्यासाठी राजकीय क्षेत्र हे दुय्यम आहे. त्यांचे कार्य वर्णव्यवस्थेप्रमाणे कार्य चालते.म्हणजे १)ब्राह्मण २)क्षत्रिय ३)वैश्य व ४)शूद्र इथे "वर्णक्रमेण कार्याणी पश्यंती,कार्यणा्म " हे सूत्र तंतोतंत पाळल्या जाते. म्हणजेच सर्वाच्या वरती १) RSS, त्याच्याखाली २)भारतीय जनता पक्ष, त्याच्याखाली ३)विश्व हिंदू परिषद आणि सर्वात शेवटी शूद्र वर्गासाठी ४)बजरंग दल आहे.
या देशात शासन मोगलाचे असो इंग्रजांचे असो की काँग्रेसचे असो प्रशासन हे नेहमी ब्राह्मणाच्या हातात राहिलेले आहे. याचा फायदा ब्राह्मणांनी पुरेपूर करून घेतलेला आहे हे नेटवर्क हे प्रेस मीडिया, शाशन, प्रशासन, न्यायव्यवस्था, शिक्षणक्षेत्र आणि इतरसर्व क्षेत्रात पसरलेले आहे.यामुळे कोणत्या क्षेत्रात काय सुरू आहे कोण मंत्री किती करप्शन करतो, कोणत्या न्यायाधीशाचे काय लकडे आहे कोणता उद्योगपती किती लफडे करतो कोणता अधिकारी किती संपत्ती जमवतो हे सगळं त्यांना माहीत असते आणि त्याची पुराव्यासहित फाईल ते तयार करीत असतात एक प्रकारे त्यांच्या सेवकावर टाकलेली जबाबदारी ती पार पाडीत असतात एवढेच नाही तर विरोधी पक्षांचे सर्व लफडे यांना माहीत असतात कारण हे सेवक सर्व क्षेत्रांतील लोकांमध्ये पसरले आहेत व ते एक प्रकारे मुखबीर(इन्फॉरमर )चे काम काम करीत असतात शासनात, प्रशासनात, न्यायासनात आणि प्रेस मीडियात महत्त्वाच्या पदावर असल्यामुळे विरोधकाला कधी संपवायचे व कसे संपवायचे हे त्यांना माहीत असते आणि वेळ पडल्यास ते त्यांची योजना प्रत्यक्षात उतरवतात. सगळ्यांच्या गुप्त फायली पुराव्यासहित RSS कार्यालयात मेंटेन करण्यात येतात . कित्येक चांगल्या अधिकाऱ्यांना ,मंत्र्यांना राजकारणांना बर्बाद करूनही या सेवकाची भाषा आणि व्यवहार मात्र अत्यंत नम्र असतो.
परीक्षा कोणत्याही असो मग ती नीट ची परीक्षा असो इंजिनिअरिंगची परीक्षा असो की यूपीएससीची असो की डिपार्टमेंटल प्रमोशन एक्झामिनेशन असो, शाखेतले अत्यंत सुमार असलेले सेवक ती परीक्षा पास करतात याचे कारण यांच्या नेटवर्कमध्ये आपल्याला सापडेल परीक्षेच्या पूर्वीच यांच्या खास लोकांना आतून पेपर मिळतो याचे रहस्य हे त्यांच्या नेटवर्कमध्ये दडलेले आहे. सेवक असलेले परीक्षार्थी कोणत्याही मुलाखतीत नापास होत नाही याचे कारण म्हणजे इंटरव्यू . कोणत्याही परीक्षेचा इंटरव्यू घेणाऱ्यांमध्ये जे अधिकारी बसतात ते जास्तीत जास्त त्यांचेच असतात. न्यायाधीशासारख्या पदावर नियुक्ती देणाऱ्या कोलोजियम मध्ये त्यांचेच जजेस असतात प्रेस मीडियामध्ये त्यांचीच माणसे बसल्यामुळे कोणत्या बातम्या छापायचे आणि कोणत्या बातमीला केराची टोपली दाखवायची कोणत्या बातमीची धार बोथट करायची कोणत्या बातमीची हेडलाईन बनवायचीहे त्या मानसिकतेच्या लोकांच्या हातात असते आणि ते काम ते त्यांची स्वतःची ओळख न दाखवता प्रामाणिकपणे करीत असतात यांच्या या नेक्सेसमुळे भारताच्या सर्व क्षेत्रात ही माणसे पसरली असल्यामुळे त्यांचा दबदबा निर्माण झालेला आहे यांच्या या नेक्सेसमुळे चांगल्या मेरीटोरीयस प्रामाणिक अधिकाऱ्यांना काम करायला प्रचंड अडचण जात असते.
ते म्हणतात की आम्ही राजकारण करीत नाही आणि राजकीय निर्णयावर प्रतिक्रिया ही देत नाही पण हे सगळं लोकांना दाखविण्यासाठी असते त्यांची माणसे निवडणुकीत उभी राहतात ,राजकारणात अत्यंत सक्रिय असतात, एका विशिष्ट पार्टीचा हिरीहिरीने प्रचार करतात विधानसभेत लोकसभेत निवडून जातात मंत्री बनतात मुख्यमंत्री बनतात आणि वरतून छाप ठेवतात की संघराज्य राजकारण करीत नाही कितीही बनवेगिरी आहे. त्यांनीच निर्माण केलेला भारतीय जनता पक्ष हा त्यांचा अजेंडा पुर्ण करण्याकरिताच काम करीत असतो. त्यांचे म्हणणे आहे की आम्ही हिंदुराष्ट्र निर्मितीसाठी काम करतो पण हिंदूराष्ट्र हा शब्द सर्वसामान्य लोकांना भ्रमित करण्यासाठी घेतलेला आहे . प्रत्यक्षात हिंदूराष्ट्र नावाच्याआड ब्राह्मणराष्ट्र निर्मितीसाठी ते काम करीत आहेत. आणि ब्राह्मणराष्ट्र म्हणजे सर्व क्षेत्रात ब्राह्मणाचे वर्चस्व निर्माण करणे, वर्ण व्यवस्थेवर आधारित मानसिकता निर्माण करणे व ती कायम ठेवणे आहे. वर्णव्यवस्था पक्की होणे म्हणजेच जात व्यवस्था घट्ट होणे होय. वर्णव्यवस्था,जातव्यवस्था घट्ट होणे म्हणजे देश कमजोर होणे होय यापूर्वी ह्या देशात वर्ण व्यवस्था जातव्यवस्था घट्ट झाल्यामुळे हा देश नको त्या लोकांच्या गुलामीत गेला व हजारो वर्ष गुलामीत राहिला.
नरेंद्र मोदी हा दाखवायला ओबीसी आहे पण त्याचा मेंदू संपूर्ण या संघटनेच्या फॅक्टरीतून तयार झालेला आहे म्हणून ते सांगेल तेच काम नरेंद्र मोदी करीत आहे त्यांच्या फॅक्टरीतून तयार झालेले सेवक आज भारताचे मंत्री आणि प्रधानमंत्री आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, आयएएस ,आयपीएस अधिकारी आहेत, केंद्र व राज्य सरकारचे मुख्य व प्रधान सचिव आहेत, मीडिया प्रमुख आहेत तिथे त्यांच्या विरोधात जायची हिंमत जे करतात त्यांच्या हिमतीला दाद द्यावी लागेल पण त्यांच्या विरोधात जाणाऱ्यांची नेहमी पद्धतशीरपणे वाट लावण्यात येते. त्यांना खोट्या केसेसमध्ये फसवण्यात येते यांच्या षडयंत्राला बळी पडलेला मी सुद्धा एक व्यक्ती आहे. अशा प्रकारे त्यांचा दहशतवाद संपूर्ण भारतात पसरलेला आहे. ही संघटना म्हणजे एक प्रकारचा "कोल्ड ब्लडेड माफीया" आहे .
भारतात भारतीय जनता पक्षाला सोडून इतर सर्व राजकीय पक्षाची आपली स्वतंत्र विचारसरणी व भूमिका असते, त्यांचा पक्षप्रमुख हा राजकीय पक्षाचा सर्वोच्च नेता असतो नेत्याचा निर्णय अंतिम असतो पण भाजपचे असे नाही भाजपमध्ये अध्यक्षपद हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी असते, भाजपमध्ये त्यांचा अंतिम नेता हा आरएसएस आहे. त्याचे अपत्य असलेल्या भारतीय जनता पक्षाला स्वतंत्र भूमिका नाही त्याला सांगेल तेच काम करावे लागते एक प्रकारे भाजप हा सांगकाम्या पक्ष आहे कारण भाजपच्या सगळ्या मोठ्या पदावर त्यांचेच सेवक बसलेले आहेत त्या सेवकाच्या निष्ठा या भारत सरकारवर आणि भारत देशावर नसून आरएसएसवर आहेत. म्हणून अडवाणी सारख्या उपप्रधानमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीला जेव्हा अपमानित करून पक्षातून शून्य करण्यात येते तेव्हा ते सुद्धा विद्रोह करून आपला वेगळा पक्ष काढायची हिंमत करीत नाही त्यांचेच नाही तर कोणत्याही भाजपच्या माणसाचा त्यांच्या पक्षात कितीही अपमान झाला तरी त्यांनी विद्रोह करून दुसरा पक्ष काढलेला नाही कारण त्यांची ताकद त्याला माहीत आहे त्याला हेही माहीत असते की पक्षाच्या विरोधात जाऊन आपण वेगळा पक्ष काढणे म्हणजे आपल्याच हाताने आपली कबर खोदणे होते याचा बोध आपण लालकृष्ण अडवाणी आणि एकनाथ खडसे यांचे राजकीय कारकीर्द कशी समाप्त करण्यात आली याच्यावरून बोध घेऊ शकतो अडवाणी आणि खडसे यांच्यासारखे कितीतरी उदाहरणे तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये सापडतील.
याउलट इतर राजकीय पक्ष आपसी वैचारिक मतभेदामुळे फुटलेत कारण त्यांच्यात लोकशाहीची मूल्ये होती म्हणून ते फुटले हे सत्य आहे कारण जिथे वैचारिक स्वातंत्र्य आहे तिथे मतभेद असतातच. आणि जिथे मतभेद असतात तिथे कधी ना कधी फुटाफट होतेच हे नैसर्गिक सत्य आहे .इथे माणसालाच महत्त्व नाही म्हणून तिथे मानसाच्या म्हणजेच सेवकाच्या वैयक्तिक मताला महत्त्व नाही. वैयक्तिक मताला महत्त्वच नाही म्हणून तिथे मतभेदाचा प्रश्नच येत नाही. यामध्ये फक्त ब्राह्मण समाजाच्या हिताला आणि त्यांच्या वर्चस्वाला महत्व आहे आणि त्याकरिता ते स्पष्टपणे साम-दाम-दंड-भेद व कपटनीतीचा सर्रास वापर करतात हे फक्त मुख्य संघटनेतच नाही तर जेवढ्या उपसंघटना आहेत त्या सर्व संघटनांमध्ये हीच निती अवलंबिल्या जाते जे पक्ष ज्या संघटना लोकशाहीच्या मूल्यावर उभ्या राहतात त्या पक्षामध्ये मत स्वातंत्र्य असते आणि मत स्वातंत्र्य असल्यामुळे तिथे मतभेद असतात आणि मतभेद असल्यामुळे बरेचदा राजकीय पक्ष आणि इतर पक्ष फुटतात पण इथे ब्राह्मण समाजाच्या वर्चस्वासाठी भाजपची आणि आणि इतर संघीय संघटनांची निर्मिती झाल्यामुळे त्यांच्यामध्ये लोकशाहीची मूल्ये आणि व्यक्ती स्वातंत्र्य नाही. लोकशाही आणि व्यक्ती स्वातंत्र्य ब्राह्मणवादात बसत नाही. ब्राह्मणवादाच्या विरोधात ब्राह्मण जरी गेला तरी त्याची वाट लावण्यात येते म्हणून आरएसएस आणि त्याच्या उपसंघटना मग तो भाजप असो किंवा विश्व हिंदू परिषद व इतर कोणती संघटना असो फूट होत नाही लोकांच्या हितासाठी कल्याणासाठी निर्माण झालेल्या संघटनात मतभेद आणि फुट ही ठरलेली असते पण एका विशिष्ट जातीचा हितासाठी वर्चस्वासाठी निर्माण झालेला संघटनांमध्ये फूट होत नाही आणि होणार नाही आणि म्हणून भाजप आणि आरएसएस फुटत नाही.
- प्रमोद मून (27-7-2024)
0 टिप्पण्या