Top Post Ad

Z.P.Thane आरोग्य सेवक महिला पदावरून आरोग्य सहाय्यक महिला पदावर ३० कर्मचाऱ्यांना पदोन्नती

 जिल्हा परिषद, ठाणेच्या आरोग्य विभागातील आरोग्य सेवक महिला पदावर कार्यरत असलेल्या ३० कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक महिला या पदावर पदोन्नती देण्यात आली. यानिमित्ताने आज, दि. २७ ऑगस्ट, २०२६ रोजी जिल्हा परिषद, ठाणेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते पदोन्नती आदेश वितरित करण्यात आले. यावेळी पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करून त्यांच्या नव्या जबाबदाऱ्या व कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यात आरोग्य सेवक महिला व आरोग्य सहाय्यक महिला यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आरोग्यविषयक विविध योजना, माता व बाल आरोग्य सेवा, लसीकरण, कुटुंब कल्याण, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीत या कर्मचाऱ्यांचा थेट सहभाग असतो.

“पदोन्नतीसोबत जबाबदारीही वाढते. आरोग्य विभागातील क्षेत्रीय कर्मचारी हे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. पदोन्नती मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी नव्या जबाबदाऱ्या संवेदनशीलतेने आणि कार्यक्षमतेने पार पाडत नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी योगदान द्यावे,” असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले.

या पदोन्नतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचे आभार व्यक्त केले. ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नव्या जबाबदारीतून प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमास जिल्हा आरोग्य विभागातील जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटिल, सहाय्यक प्रशासन अधिकारी (सामान्य प्रशासन) नितिन घोडके, कनिष्ठ प्रशासन अधिकारी (आरोग्य विभाग) ऋतुजा सरनोबत, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अपर्णा हरपळे, वरिष्ठ सहाय्यक राजेश लोकरे, संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पदोन्नती मिळालेले आरोग्य सहाय्यक महिला उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com